
शेगाव येथे दि. १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान निःशुल्क ध्यान शिबिराचे आयोजन
शेगाव तालुका प्रतिनिधी गजानन ददगाळ
शेगाव श्री संत गजानन महाराज यांच्या पावन आशीर्वादाने तसेच ब्रह्मर्षी पितामह सुभाषजी पत्री यांच्या दिव्य प्रेरणेने, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र शेगाव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दि. १४ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान निःशुल्क “महाराष्ट्र ध्यान महायज्ञ” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पी.एम.सी. हिंदी व पी.एस.एस.एम.च्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.या ध्यान महायज्ञात देशभरातील प्रख्यात पिरॅमिड मास्टर्स मार्गदर्शन करणार असून त्यामध्ये परिणीता पत्री, ब्रह्मर्षी शशिकांत जोशी, ब्रह्मर्षी प्रेमनाथ, ध्यानरत्न पी. व्ही. रामराजू, शम्पा मुखर्जी, श्रेयांश डागा, माहेश्वरी कुमारी, अमूल्या शास्त्री, माधवी नादेला, आशा नकरानी, नरेंद्र मुदलकर, डॉ. खुशाली लूखी, चंद्रशेखर रेड्डी, मानसी लछंदानी आदी मान्यवरांचा समावेश आहे. शिबिरादरम्यान दररोज सकाळी ५ ते ८, दुपारी १२ ते १ आणि रात्री ८.३० ते ११.३० या वेळेत सामूहिक ध्यान व दिवसभर विविध आत्मज्ञान सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्री निमित्त विशेष ५ तासांचे रात्र ध्यान सत्र रात्री ८.३० ते रात्री १.३० या वेळेत होणार असून हे विशेष सत्र शम्पा मुखर्जी मॅडम घेणार आहेत.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वरिष्ठ ध्यान मार्गदर्शक मास्टर श्रेयांश डागा हे दि. १६ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे उपस्थित राहणार असून त्यांचे ध्यान व ज्ञान सत्र सकाळी ९.४५ ते ११.४५ तसेच सायं. ४.०० ते ६.०० या वेळेत होणार आहे. महाराष्ट्रात अशा वरिष्ठ मार्गदर्शकांची उपस्थिती ही साधकांसाठी मोठी संधी मानली जात आहे या महायज्ञाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दि. १४ फेब्रुवारी सकाळी १० ते दि. १७ फेब्रुवारी सकाळी १० या कालावधीत ७२ तासांचे अखंड ध्यान आयोजित करण्यात आले आहे.शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता या ध्यान शिबिराचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चैनसुखजी संचेती मलकापूर आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी गुरुदेव सेवाश्रम, नांदुरा शिवसेना उपनेते सुभाष पाटील संभाजीनगर डॉ. पूनम नोमूलवार आर्ट ऑफ लिव्हिंग, हैदराबाद, ब्रह्मश्री शशिकांत जोशी पुणे चंद्रशेखर रेड्डी सोलापूर, पूर्णचंद्र राव सोलापूर, सौ. कविता चढ्ढा नागपूरआदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या ध्यान शिबिरामध्ये सहभागी साधकांसाठी निःशुल्क चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शिवांश सेलिब्रेशन, खामगाव रोड, शेगाव येथे होणार आहे.या “महाराष्ट्र ध्यान महायज्ञा”त मोठ्या संख्येने सहभागी होऊन शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन पी.एस.एस.एम. महाराष्ट्रच्या डायरेक्टर देवयानी नवगजे, तसेच वाशिमचे रुपेश लढ्ढा, सुमित खत्री, संजय व्यास, चंद्रकांता जाधव, शुभांगी कुटे या कार्यकर्त्यांनी केले आहे.
