अमानी ते धामणगांव देव माऊली पायदळ पालखी सोहळा

अमानी ते धामणगांव (देव )माऊली पायदळ पालखी सोहळा

मालेगाव ता प्रतिनिधी(अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातील मौजे अमानी येथुन श्री क्षेत्र धामणगाव देव येथे श्री मुंगसाजी माऊली पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्त मंडळी भजनी मंडळी सहभागी होणार आहेत, पालखीत वाचन कार तसेच कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत तरी भाविकांनी बहुसंख्याने सहभागी होऊन आपले जीवन कृतार्थ करावे,हा पायदळ पालखी सोहळा १८ फेब्रुवारी मानेवरून प्रस्थान होणार असून २४ फेब्रुवारीला धामणगाव येथे पोहोचणार आहे, या पहिल्या दिंडी पालखी सोहळ्याची हे 24 वे वर्षे असून पालखी सोहळ्यामध्ये मार्गदर्शक म्हणून ह भ प केदारलिंग महाराज रा कडतीकर, ह भ प ज्ञानोबाराव महाराज देशमुख, ह भ प पुरुषोत्तम महाराज ,ह भ प संकेत महाराज देशमुख यांचे राहणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 17 फेब्रुवारी रोज मंगळवार ला सायंकाळी आमनी येथे गावातून पालखी सोहळ्याची गाव प्रदक्षिणा होणार आहे, या दिवशी अन्नदाते रमेश अंभोरे व रामदास मोरकर हे असुन १८ फेब्रुवारी रोज बुधवार ला सकाळी दिंडी सोहळा धामणगाव कडे प्रास्थान होणार असून २४ फेब्रुवारीला तेथे सांगता होणार आहे, दरम्यान रात्रीचे मुक्काम जोडगव्हाण, जुनना सोनवळ आजगाव ,कोठारी ,भोहिनी फाटा व धामणगाव चौसाळा येथे राहणार आहे, दुपारचे व रात्रीचे अन्नदाते म्हणून समाधान ठाकरे महादेव लांडकर गजानन भोमणे माजी मंत्री सुभाषरावजी ठाकरे गणेश राव देशमुख अरुण भाऊ देशमुख परसराम राठोड विनोद झळके ठाणेदार तात्याराव आदमने महादेव गोटे गणेश राठोड गणेश गोदमले नानाजी ठाकरे हनुमान संस्थान कोठारी लोमेश पाटील दत्ता ट्रेडर्स विठ्ठल गवळी सुरेश सरनाईक लक्ष्मण गवळी भानुदास गवळी, यांच्यावतीने राहणार आहे अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक अशोकराव सरनाईक गणपत लढा वैभव ठाकरे श्रावण झळके यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *