मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते.

मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते.

ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे

राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत.महाराष्ट्र हे भारतातील एक आघाडीचे औद्योगिक राज्य असून, ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान (IT), फार्मास्युटिकल्स, कापड आणि रसायन उद्योगांमध्ये ते अग्रेसर आहे औद्योगिक क्षेत्रे :-(MIDC): MIDC- ने राज्यभरात २३३ हून अधिक औद्योगिक क्षेत्रे विकसित केली आहेत, जी उद्योगांना पायाभूत सुविधा पुरवतात.महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीमध्ये MIDC चे मोठे योगदान आहे, जे औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा पुरवते.प्रामुख्याने विदर्भामध्ये उद्योग उभारणी व्हावी , Vidarbha उद्योगाचा हब या ठिकाणी उभारण्यात यावा. यासाठी केंद्रीय मंत्री श्री .नामदार. नितीनजी गडकरी साहेब यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री नामदार .श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे दिनांक ६ फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी-2026 पर्यंत ” ऍडव्हान्टेज विदर्भ 2026,” (खासदार औद्योगिक महोत्सव )सुरू केलेला आहे. AID-असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ,” या फॉर्म तर्फे ऑर्गनायझेशन करण्यात आलेला Vidarbha ,s Megha Industrial Expo ,” निश्चितपणे विदर्भातील मेगा इंडस्ट्रियल उभारणी करिता अत्यंत महत्त्वपूर्ण सेमिनार आहे. या ठिकाणी विदर्भातील तरुणांनी/ युवकांनी उद्योग उभारणी करिता सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा मी राजाभाऊ गडलिंग,( समाज भूषण आणि पत्रकार आणि विशेष कार्यकारी अधिकारी,) करीत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ,या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एडवांटेज विदर्भ- 2026 या ठिकाणी संपूर्ण भारतातून फार मोठे उद्योजक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. अनेक कंपन्यांचे सेमिनार या ठिकाणी बघण्यासाठी आहेत.त्याचप्रमाणे विविध ,” कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग स्टॉल ,” सुद्धा बघण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि हा सर्व निशुल्क असे हे सेमिनार असून,” एडवांटेज विदर्भ -2026 मध्ये विदर्भातील युवकांनी या ठिकाणी उद्योग उभारणी करीतi आणि अभ्यास आणि बघण्याकरिता सहभागी व्हावे ,असे आवाहन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *