
श्रीसंत सोनार महाराजांच्या पुण्यतिथनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात सामूहिक आरती सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी मालेगाव :(अनिल जाधव)
येथे श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. अभिषेक,होमहवन, सामूहिक आरती, सोनार कुटुंब मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरुषोत्तम भोंडकर होते. चंद्रकांत गोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय रत्नपारखी (पोलीस निरीक्षक, अकोला) तसेच दीपकराव टाक (नांदेड) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी सोनार महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी व उत्सव समितीच्या कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी यांनी सामाजिक कार्यात सर्वांनी सहकार्य करावे, प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच मुलांनी उच्च शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, आई-वडील व समाजाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, समाजाची प्रतिष्ठा कमी होईल असे कोणतेही कृत्य होऊ देऊ नये, असे आवाहन केले.दीपकराव टाक यांनीही मार्गदर्शन करताना मंदिराच्या कार्यात सहकार्य करावे तसेच भविष्यात वर-वधू परिचय मेळाव्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलोनी वाळेकर व देवयानी कल्याणकर यांनी केले. प्रस्तावना अमोल कल्याणकर यांनी मांडली. तर, जान्हवी गौरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सोनार समाजातील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सव
