
विजय महाराज शास्त्री यांच्या किर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मालेगाव प्रगट दिनानिमित्त शिव पुराण व कीर्तनास हजारो संख्येने भावीकांची उपस्थिती
मालेगांव प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव येथील गजानन महाराज मंदिराजवळ श्री शिवमहापुराण कथा व किर्तन मोठ्या उत्साहात पार पडत असुन रोज परिसरातील भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत दि३ फेब्रुवारी रोजी रात्री श्री विजय महाराज गवळी शास्त्री यांचे कीर्तन उत्साहात संपन्न झालेअसुन येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त चालू असलेल्या सप्ताहात विजय महाराज शास्त्री यांनी आपल्या कीर्तनातून भगवंताच्या नामस्मरणाने आपल्याला काय फळ भेटते हे सांगितले. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी येथील सप्ताहाचे आयोजक नियोजक सेवेकरी मंडळी यांचे तोंड भरून कौतुकही केले. मी मालेगाव तालुक्यातील आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की माझ्या भागातला परमार्थ ऐश्वर्यात संपन्न होत आहे. असेही ते बोलले . कीर्तनानंतर विधान परिषदेच्या आमदार मा भावनाताई गवळी यांनी सुद्धा विजय महाराजांचे स्वर अगदी हृदयाला स्पर्श करत होते मी असे किर्तन कधीच ऐकले नाही इतके सुंदर किर्तन महाराजांनी केले असेही यावेळी त्या म्हणाल्या ,१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत येथे भागवत सप्ताह उत्सव साजरा होत असून शिव महा पुराण कथेचे वाचन श्री उत्तम स्वामी महाराज यांच्या वाणीतून असून,रोज रात्री महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले कीर्तनकार यांचे किर्तन होत असून यासाठी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आहेत, विजय महाराज शास्त्री गवळी अमानीकर यांच्या कीर्तनाच्या वेळेस विधान परिषदेच्या आमदार विदर्भ कन्या भावनाताई गवळी यांच्या सह, नगर पंचायतचे नगराध्यक्ष ओम भाऊ खुरसडे, तालुका प्रमुख प्रदीप कुटे, उपनगराध्यक्ष नगरपंचायत चे सदस्य तसेच शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी सेवाधारी मंडळी संत गजानन महाराज संस्थानचे पदाधिकारी आयोजक संयोजक यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता
