
कोथळी पश्चिम बीटमध्ये बिबट्याने रोही निलगाय प्राण्याची शिकार करून पाडल्या फडश्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशार
अमीन शेख कार्यकारी संपादक
मोताळा तालुक्यातील कोथळी गावाजवळील पश्चिम बीट परिसरात ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री . प्रकाश सरोदे यांच्या शेताजवळील वानखडे यांच्या शेतात बिबट्याने निलगाय (रोही) चा फडशा पाडला ची घटना घडली. ही शिकार रात्रीच्या सुमारास झाली असून, निलगायचे अवशेष शेतातील गव्हाच्या पिकात आढळले.सध्या रब्बी हंगाम सुरू असून, बहुतांश शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांची लागवड केली आहे. तारापूर धरणाच्या पाटबंधारे पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गहू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, पाणी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शेतात जाणे लागत आहे. रात्रभर शेतात वावर करावा लागत असल्याने ही घटना शेतकऱ्यांसाठी मोठी धास्ती ठरली आहे.घटनेची माहिती मिळताच मोताळा प्रादेशिक वन विभागाचे राऊंड ऑफिसर पी. एस. साडोक, त्यांनी शेतातील निलगायचे मृत शरीराचे अवशेष लचके तोडलेल्या अवस्थेतआढळून आले व जवळ बिबट्याचे पंजाचे ठसे मिळून आले परिसराची पाहणी केली असता बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे आढळून आले नीलगाय वैद्यकीय तपासणीसाठी मोताळा येथे नेण्यात आले वनविभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन वन विभागाचे राऊंड ऑफिसर पी. एस. साडोक यांनी परिसरातील शेतकऱ्यांना खालील सूचना दिल्या आहेत:रात्री शेतात जाताना एकटे जाऊ नका, नेहमी दोन-तीन किंवा समूहाने जा.मोबाईलवर गाणे किंवा मोठा आवाज वाजवून जा, जेणेकरून बिबट्या जवळ येणार नाही.टॉर्च किंवा मोठा प्रकाश घेऊन जा.हातात काठी किंवा अन्य साधन ठेवा.शक्यतो रात्री उशिरा शेतात जाणे टाळा किंवा जास्त सावधगिरी बाळगा.मागील काही महिन्यापूर्वीच बिबट्याने सहस्त्रूमुडीयेथे मेड्या व गाय मारल्याची घटना घडली होतीकोथळी शिवारात गेल्या काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. वनविभागाकडून परिसरात पाहणी आणि निरीक्षण सुरू असून, आवश्यकता भासल्यास पिंजरे लावण्याची कारवाई केली जाऊ शकते.शेतकऱ्यांनी ही सूचना गांभीर्याने घ्यावी आणि स्वतःचे संरक्षण करावे. कोणत्याही संशयास्पद हालचाली व बिबट दिसल्यास तातडीने वन विभाग माहिती द्यावी त्यावेळी गावातील नागरिक तसेच कोथळी-बीडचे वनरक्षक बाळासाहेब घुगे, चालक वैभव फुंडे तसेच आबिद खान, मन्नान खान, आशिष ससाने, शेख शोएब, शेख इनुस शेख अफसर पत्रकारइम्रान शाह हुसेन शाह व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतेमराठी समाचार न्यूज 24 साठी अमीन शेख कार्यकारी संपादक शेगाव
