
शिवसेना खेर्डा बू. जिल्हा परिषद सर्कल आढावा बैठक संपन्न
जळगांव जामोद: प्रतिनिधी.
दि 30जानेवारी रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात शिवसेना युवासेना,पक्ष संघटन, बूथ प्रमुख व शाखा प्रमुख यांची आढावा बैठक खेर्डा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष डीवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली पार पडली.यावेळी उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, उपजिल्हा संघटक वसंत मिरगे, तालुका प्रमुख संजय धुळे, शहर प्रमुख संजय भुजबळ, वासुदेव राजनकार किसान सेना तालुका प्रमुख गजानन देशमुख, संतोष भाकरे, विभाग प्रमुख प्रदीप वानखडे,युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे, युवासेना उपतालुका प्रमुख मंगेश टाकसाळ, गणेश वसुले, विभाग प्रमुख दिपक माजरे, शेख नावेद, यांच्या उपस्थितीत खेर्डा खुर्द व निंबोरा बुद्रुक या दोन गावाच्या शाखाप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली सतीश देशमुख खेर्डा खुर्द, शाखा प्रमुख , शाखा प्रमुख सोनाजी देवकर निंभोरा बू, अमोल गाळकर, सुमित चव्हाण, अरुण क्षिरसागर, गजानन उज्जैनकर, अरुण राजुरकर, संतोष लोळे, पुंडलिक तायडे, योगेश तायडे, जयप्रकाश वाघ यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते ही आढावा बैठक जिल्हा परिषद सर्कलचे इच्छुक उमेदवार ज्येष्ठ पत्रकार वासुदेव राजनकार यांचे र निवासस्थानी खेर्डा येथे संपन्न झाली .
