
श्रीक्षेत्र काळामाथा यात्रेत मोफत पाणी वाटप
मालेगाव प्रतिनिधी (अनिल जाधव)
आज मालेगाव तालुक्यातील संत अवलिया महाराज यांच्या यात्रे निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतिने व तालुका महासचिव आदरणीय राजुदादा जमधाडे आणि वाघळुद ग्रामपंचायत चे सरपंच कृष्णा देशमुख यांच्या संकलपणेतुन यात्रेकरु साठी आज पासुन चार दिवस मोफत (फिल्टर) पाणी वाटपाचे उद्घाटन करण्यात आले…याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक जऊळका पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक आदरणिय हिवरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितित वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि वाघळुद ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा देशमुख हे उपस्थित होते.तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड , तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार , जउळका सर्कल अध्यक्ष वासुदेव कांबळे, गोविंद वर्मा , माणिकराव भगत , दिनेश खडसे, संजय खडसे , इंजिनीयर मंगेश माणिक भगत , ऋषिकेश भगत , रतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर भगत हनवतखेडा, दत्तराव भगत, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते…
