
अमानी येथील सुपिनाथ महाराज संस्थान जवळ दांडी पौर्णिमा निमित्त महाप्रसाद वाटप
मालेगाव तालुका प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील अमानी येथील संत सुपिनाथ महाराज संस्थान जवळ आज असलेल्या दांडी पौर्णिमा निमित्त महाप्रसादाचा वाटप करण्यात आला असून, दर्शनासह महाप्रसादाचा लाभ गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला, गावापासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत असे सुपीनाथ महाराजांचे मंदिर आहे, येथे नागपंचमी ला यात्रा उत्सव असतो,तर दांडी पौर्णिमा निमित्त महाप्रसादाचा वाटप करण्यात असते, अतिप्राचीन काळापासून असलेल्या या सुपिनाथ महाराज संस्थान जवळ (मंदिरात) रोज पुजारी बबन अंभोरे व चुनीलाल भंडारी, नेहमीच पूजा आरती करत असतात तसेच दर सोमवारला भाविक येथे दर्शनासाठी येत असतात, माजी आमदार विजयराव जाधव यांनी येथे स्थानिक निधीमधून सभागृह दीले,तर मा जि प, सदस्या सौ उषा अनिल जाधव यांनी पीण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निधीमधून दीलेले, आहे आज गावकऱ्यांच्या वतीने दांडी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा वाटप करण्यात आला असून प्रशाद वाटण्याचं कार्य युवक मंडळीने केलं असुन येथे रस्त्याचे तसेच सभागृहाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे
