
शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा
डॉ.मोहन गोरे यांचे आवाहन : आरोग्य विभागाकडून रक्त तपासणीनंतर व मोफत औषधी वितरण
मालेगाव, प्रतिनिधी
राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने गोरगरीब मजूर तसेच सर्वसामान्य लोकांसाठी आपले आरोग्य स्वास्थ चांगले निरोगी राहण्याकरिता आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात असून याचा लाभ पात्र रुग्ण धारकांनी घ्यावा, असे आवाहन एमएमयू (मोबाईल युनिटचे) डॉ.मोहन गोरे यांनी केले.मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ३० व ३१ जानेवारीला बांधकाम कामगार मजुरांची यापूर्वी रक्त तपासणी झालेली आहे अशा महिला पुरुष मंडळींची दोन दिवस तपासणी करून त्यांना औषध उपचार व मोफत मार्गदर्शन केले.
यावेळी समन्वय अनिकेत जनबंधू डॉ.मोहन गोरे, नर्स सीमा कांबळे, शुभांगी जाधव, सिद्धार्थ खाडे यांनी रुग्णास तपासणी करून मोफत औषध उपचार करून दिले. आरोग्य विभागाकडून रक्त तपासणीनंतर बांधकाम कामगारांसाठी मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने वाशीम बांधकाम कामगार कल्याण आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. एम.एम.यू. (मोबाईल मेडिकल युनिट) च्या सहाय्याने भेट गावात जाऊन सेवा देण्यात आल्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगारांना आरोग्य तपासणीसाठी शहरात जाणे अनेकदा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत गावातच तपासणी व उपचार उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रक्त तपासणीच्या अहवालानुसार काही कामगारांमध्ये रकाक्षय, थकवा, पोषणअभाव तसेच इतर किरकोळ आजारांचे निदान झाले होते. बांधकाम कामगारांना औषधांचे वितरण करताना डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शनही करण्यात आले. नियमित औषधोपचार, पोषक आहार, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
