आरोपीला ठोकल्या बेड्या कारंजा पोलिसांची मोठी कारवाई

घरफोडीचा गुन्हा उघड, आरोपीला ठोकल्या बेड्या कारंजा पोलिसांची कारवाई चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी कारंजा

कारंजा (घाडगे) : शहरातील बंद घराला टार्गेट करुन चोरट्याने हात साफ केला होता. याप्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासचक्र फिरवून नागपुरातून आरोपीला अटक केली.अंश ऊर्फ अंशुल नितीन गजबे रा. नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कारंजा येथील हरीश रामेश्वर भांगे यांच्या घरी २५ जानेवारीला अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन कपाटात ठेवलेले ५५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. यासंदर्भात हरिश भांगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी पथक तयार करुन तपासाला गती दिली. पथकाने आरोपीचा शोध घेऊन अंश गजबे याला नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन, उपनिरीक्षक सागर महल्ले, हवालदार नितेश मैदपवार, खुशाल चापले, दिनेश घसाड, मंगेश मिलके, आशिष कालोकार, अमोल मानमोडे, राहुल अमुने यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *