कुणबी समाज वरवधु परीचय संम्मेलनाला भरगोस प्रतीसाद

कुणबी समाज वरवधु परीचय संम्मेलनाला भरगोस प्रतीसाद

शेगाव प्रतिनिधी

शेगांव दि30जानेवारीश्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था अकोला च्या वतीने संत नगरी शेगांव येथे उपवरवधु परीचय संम्मेलन घेण्यात आले या मेळाव्याला भरगोस प्रतीसाद मिळाला या प्रथम राज्यस्तरीय उपवरवधू परीचय मेळाव्यात सोयरीक पुस्तिका प्रकाशन करण्यात आले तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे म्हणजे या ठिकाणी नाविन्यपूर्ण पद्धतीने मेळाव्यामध्ये उपवर मुले, मुलीच्या मुलाखती पार पडल्या व त्या कॅमेरा द्वारे रेकॉर्ड करून स्क्रीनवर सर्व लोकांना दिसतील अशा पद्धतीने पाहावयास मिळाल्या उपस्थित लोकांना 50, 50 गाव फिरून जे उपवर वधू वर पाहता येतात ते एकाच दिवशी पहावयास मिळाले, या राज्यस्तरीय मेळाव्याचे अध्यक्षस्थानी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री दयारामभाऊ वानखडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशदादा फुंडकर, माजी आमदार ज्ञानदेवरावजी ठाकरे माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री शिवदासजी महाराज गाडेकर, बुलढाणा जिल्हा कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री गुलाबरावजी महाले, नांदुरा कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष केदारभाऊ ढोरे, खामगाव कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष गजाननभाऊ ढोरे स्वागताध्यक्ष पुणे येथील प्रमोद ठोंबे त्याचप्रमाणे अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश कुणबी समाजातील कार्यरत विविध समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, त्याचप्रमाणे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री विठ्ठल कुणबी समाज मंडळ शाखा पुणे चे अध्यक्ष श्री संदीपजी वडतकर यांनी समाज मंडळासाठी उपवर युवक, युवती वधूवरांची डिजिटल पद्धतीने माहिती समाजास मिळावी याकरिता एक वैबसाईड ॲप लॉन्च केले, मेळाव्याचे सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन बुलढाणा जिल्याचे अध्यक्ष श्री गुलाबरावजी महाले, अर्बन बँकचे मा. श्री रामेश्वरजी फुंडकर, सोनाजी महाराज मंदिराचे विसश्वत श्री विश्वनाथजी तिडके सोनाळा यांच्या उपस्थित श्री सागरजी फुंडकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण हेलगे संचलन डॉ हरिदास आखरे यांनी केलेकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव श्री सुरेश फाळके यांनी केले,मराठी समाचार न्यूज 24 साठी अमीन शेख कार्यकारी संपादक शेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *