बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई आरोपी कर्नाटकातून अटकेत ५ लाख रक्कम जप्त

मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आणलेले ५ लाख रुपये चोरीस गेले; बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई..आरोपी कर्नाटकातून अटकेत, रक्कम जप्त…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी घरून ५ लाख रुपये घेऊन बुलढाण्यात आलेल्या एका वडिलांवर चोरट्यांनी डोळा ठेवत थरारक चोरी केल्याची घटना समोर आली होती. मेहेकर येथून दोन चोरट्यांनी संबंधित वडिलांचा पाठलाग करत बुलढाणा गाठले आणि राजश्री शाहू विद्यालयासमोर उभी असलेल्या कारची काच फोडून कारमधील ५ लाख रुपये चोरून नेले होते.या घटनेची तक्रार ९ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निळेध तांबे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले आणि चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत चोरट्यांचा माग काढला. अखेर हे दोघे चोरटे कर्नाटक राज्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे धाड टाकत दोघांना अटक केली.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये देखील जप्त केले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून बुलढाणा पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *