
भाट समाज बहुउद्देशीय विकास संस्था जिल्हा चंद्रपूर तर्फे महिला हळदी कुंकू तथा स्नेहा मिलन दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम चंद्रपूर येथे संपन्न
25 जानेवारी 2026 कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मालारपण करून करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आप्पाजी बाविस्कर व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले श्री अरविंद जी शिंदे सर अखिल महाराष्ट्र भाट समाज महासचिव व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ॲड श्री अविनाश दादा खडतकर व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ वैशालीताई बाविस्कर तसेच जिल्हा कार्यकारणी चंद्रपूरचे सचिव श्री प्रमोद जी बाविस्कर व जिल्हा कार्यकारणी सहसचिव श्री सुनील जी चव्हाण व तालुकासचिव श्री मधुकर जी पुरटकर तसेच श्री विकी भाऊ लाडसे सरपंच ग्रामपंचायत पडोली श्री मंगेश भाऊ अहिरकर श्री पुरुषोत्तम पालेकर सर व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जी पुरटकर जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री अमोल जी पुरटकर सौ संगीता ताई चंदेलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपूर्ण चंद्रपूर येथील जमलेल्या असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडले .कार्यक्रमाची वैशिष्ट्ये कार्यक्रमाचे संचालन कु .नीमु ताई चकोर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रमोद जी बाविस्कर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण श्री आप्पाजी बाविस्कर यांनी दिले तर त्या कार्यक्रमाचे उद्घाटनिय भाषण श्री अरविंद जी शिंदे सर यांनी केले तथा अरविंद जी शिंदे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय ते सांगितले व सौ वैशालीताई बाविस्कर यांनी महिलांना मार्गदर्शन केले . व त्यानंतर बालगोपालांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यानंतर महिलांसाठी musical chair हा गेम घेण्यात आला व couples game गेम घेण्यात आले. व महिलांना हळदीकुंकू देऊन वान वाटप करण्यात आले व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधवांचे तन-मन धनानी जे सहकार्य केले त्या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो.
