
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम शेगांव (खुर्द) येथे दिनांक २५ जानेवारी २०२६ ला ” सशक्त भारतासाठी युवाशक्ती शिबिर ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य सौ. राधा सवाने, सरपंच मोहित लभाने, उपसरपंच सौ. उषा जीवतोडे, प्रा. मोक्षदा नाईक, पोलीस पाटील सौ. स्वाती नन्नावरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष धीरज वैरागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कायरकर, प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठित नागरिक चंद्रशेखर भिवदरे, अनुप नन्नावरे, केंद्रप्रमुख उराडे सर, मुख्याध्यापक अनिल मत्ते, राजू मांडवकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड आणि प्रा. डॉ. धनश्री पंचभाई या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी समाजातील समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यावर उपाय शोधण्याची भूमिका घ्यावी,
स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण व सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती निर्माण होते, तसेच शिबिरादरम्यान केलेल्या स्वच्छता, जनजागृती व सामाजिक उपक्रमांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. उपप्राचार्य सौ. राधा सवाने यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होत असून मूल्याधिष्ठित शिक्षण अधिक सक्षम होते, असे नमूद केले. सरपंच मोहित लभाने यांनी स्वयंसेवकांच्या उपक्रमांमुळे गावाच्या स्वच्छता व विकासात सकारात्मक बदल घडल्याचे सांगून ग्रामविकासात युवकांचा सहभाग वाढावा, व विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांत पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. तंटामुक्ती समिती अध्यक्ष धीरज वैरागडे यांनी संवादातून व समन्वयातून तंटामुक्त समाजनिर्मिती शक्य असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रतिष्ठित नागरिक चंद्रशेखर भिवदरे यांनी युवकांनी समाजसेवेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, राष्ट्रउभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमांमध्ये शिबिराला केलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयातर्फे सरपंच मोहित लगाने, पोलीस पाटील स्वाती नन्नवरे, चंद्रशेखर भिवदरे,धीरज वैरागडे राजू मांडवकर, लक्ष्मण गायकवाड,अनुप नन्नवरे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच गावकऱ्यांकडून प्राचार्य डॉ. मृणाल काळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड
प्रा.नीरज आत्राम,प्रा. डॉ. धनश्री पंचभाई यांचा सत्कार करण्यात आला. हा शिबिर १९ जानेवारी २०२६ ते २५ जानेवारी २०२६ या दरम्यान घेण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना तथा अहवाल वाचन प्रा. सुरेश राठोड यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. नीरज आत्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. धनश्री पंचभाई यांनी केले. शिबिरातील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी प्राध्यापकवृंद, ग्रामपंचायत शेगाव खुर्द, ग्रामवासी, स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला प्रा. हेमंत परचाके, प्रा. वराडे प्रा.तिलक ढोबळे, प्रा. गौरव चौधरी प्रा.चेतन गावंडे, शंकर पर्बत तसेच बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. मान्यवरांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
