रस्ता डांबरीकरण न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा मनसेने दिला इशारा

रोटी ते भोटा भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनसेचे २५ जानेवारीचे उपोषण अखेर लेखी आश्वासनानंतर तात्पुरते करण्यात आले स्थगित सदर रस्ता डांबरीकरण न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा मनसेने दिला इशारा

प्रतिनिधी नांदुरा

नांदुरा तालुक्यातील रोटी ते भोटा व भोटा ते कालवड पर्यंतचा रस्ता अंत्यंत बिकट परिस्थितीत असुन सदर रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊण शतक पूर्ण होऊन देखील पुर्णत्वास गेला नसल्याने येथील विद्यार्थी व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच सदर रस्ता सुस्थितीत नसल्याने भोटा येथे येणाऱ्या खामगाव – शेगाव आगाराच्या बसेस देखील बंद पडल्या असुन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हित बघता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सदर रस्ता डांबरीकरण करण्यासंदर्भात संबंधित बांधकाम विभागाशी लेखी स्वरूपात वारंवार निवेदने दिली आहेत. तसेच सदर मागणीकरीता उपोषण/ आंदोलने देखील केले होते. परंतु लेखी आश्वासनानंतर अनेकदा सदर उपोषण/आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. सदर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी संबंधित विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला पुन्हा वेळ मागितली असुन संबंधित शाखा अभियंता श्री काकडे साहेब यांनी सदर उपोषण मागे घेण्यासाठी मनसे पदाधिकारी यांना पत्र दिले असुन साधक बाधक चर्चेअंती दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु सदर मागणी यावेळी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शाखा अभियंता श्री काकडे साहेब यांना दिले आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर (पाटील), बेलाडचे सरपंच श्री सुधाकर साबे पाटील, भोटा येथील सरपंच श्री कडू भोटकर सह बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंता यावेळी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *