
नगरपरिषद चा भोंगळा कारभार अनेक वर्षापासून साचले नाल्यांमध्ये कचरे लाखो रुपयांचे टेंडर काढूनही नाल्यामध्ये साचले कचरे
जळगाव जामोद प्रतिनिधी
जळगाव जामोद शहरातील मुख्य ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ला लागून असलेले नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे या घाणीचे दुर्गंध मोठ्या प्रमाणात परिसरात होत आहे तसेच नगरपरिषदेच्या मार्फत करोड रुपयाचे सुंदरीकरण करण्यात आले त्या सुंदरीकरांना लागून असलेले नाल्या मधील घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे हे किती योग्य आहे आतापर्यंत वारंवार सामान्य माणसांनी बरेचदा नगरपरिषद ला निवेदन सूचना तक्रारी देऊनही आतापर्यंत नगरपरिषद कोणतेच पाऊल उचलले नाही याचा अर्थ असा होतो साधारण व्यक्तीच्या तक्रारीला नगरपरिषद कोणतीच दखल घेत नाही असे सामान्य व्यक्तीचे समज होत आहे बरेचदा नगरपरिषद ने लाखो रुपयांचे साफ करण्यासाठी इस्टिमेट टेंडर काढले होते परंतु आतापर्यंत हे लागू झाले का हा मोठा प्रश्न आहे त्या टेंडर वरती आतापर्यंत कोणी काम केले का? केले असते तर हे दृश्य पाहायला मिळले नसते याला जबाबदार कोण एकीकडे नगरपरिषद नारा देतो की स्वच्छ शहर पण स्वच्छता आहे तरी कुठे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष
