जिजाऊ ज्ञान मंदिराची मिरवणूक ठरली लक्षवेधी

जिजाऊ ज्ञान मंदिराची मिरवणूक ठरली लक्षवेधी.

जावेद शहा सहसंपादक

शा. प्र. दि. 12 जाने.राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणा द्वारा संचलित, जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड जु कॉलेज प. भट तर्फे रायपूर येथे भव्य ऐतिहासिक जिजाऊ जयंती मिरवणूक काढण्यात आली*. *सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, मा. मालतीताई संदीपदादा शेळके व रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार निलेश सोळंकी तसेच रायपूर चे सरपंच सुनील देशमाने यांच्या हस्ते जिजाऊ पूजन व पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरवात करण्यात आली.*. *जिजाऊ जयंती मिरवणुकीचे विशेष म्हणजे शाळेचे ढोल पथक, नववारीतील आकर्षक मुलींचे लेझीम पथक, पोवाडे वाजवणारे साऊंड, घोडयावर विराजमान माँ.जिजाऊ वेशभूषेतील कॉलेज ची विद्यार्थिनी ( साक्षी सुरडकर ), जिजाऊ व अंगरक्षक तलवारधारी मुली, चमकदार ऐतिहासिक वेशभूषेतील भाला, तलवारधारी मावळे, दांडपट्टा- तलवारबाजी-भोवरा- लाठीकाठी खेळणाऱ्या के जी ते 12 वी पर्यंतचे मुले/मुली, जिजाऊंची पालखी, (पालखीचे भोई) राजदंडधारी चोपदार, हत्यारधारी रक्षक मुली व विविध वेशभूषेतील मुलं* *आदी लवाजम्यासाहित ऐतिहासिक मिरवणूक रायपूर येथें काढण्यात आली होती*. *गावातील महिलांनी जिजाऊ पालखीचे जागोजागी पुजन करत सांस्कृतिक ठेवा जपला. गावातील महिला व मुली यांचेसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती. विविध आकर्षक रांगोळीने कार्यक्रमात रंगत आणली. गावातील सर्वधर्मीय महिला, पुरुष आदींनी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या चिमूलकले तथा सर्व रॅलीचे भरभरून कौतुक केले. एकूणच अशाप्रकारे राष्ट्राभिमान जागृत करत सर्वांची कौतुकाची थाप मिळवली.* *कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. संदीपदादा शेळके यांचे तसेच राजर्षी शाहू इंडस्ट्रीज चे सीईओ हेमंत देशमुख यांचे उपस्थिती होती तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *