पोअ.श्री. निलेश तांबे यांची मलकापूर येथील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका

पोअ.श्री. निलेश तांबे यांची मलकापूर येथील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीवर मकोका

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

बुलढाणा जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारीला कायमस्वरुपी प्रतिबंध घालून, सामान्य नागरीकांचे जिवीत व मालमत्तेचे संरक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था रहावी, यासाठी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. प्रकरणी, पो.स्टे.MIDC मलकापूर येथील अप.क्र. 138/2025 कलम 103(1),109,118(1),189(2)(4),190,191 (1) (3) भा.न्या.सं. गुन्ह्यात किरकोळ कारणावरुन एकूण-09 आरोपींनी संघटीतपणे मृतक सतीश गजानन झाल्टे रा. पिंप्राळा याचे पोटात चाकूने मारुन, त्यास जिवे ठार मारले तसेच साक्षीदार यांना जबर मारहाण केली होती. सदर अनुषंगाने, या गुन्ह्यातील आरोपींनी यापुर्वी केलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता, आरोपी संकेत सनिल उन्हाळे रा. मलकापूर व ईतर यांचेवर विवीध पो.स्टे.ला खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, हमला, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर आरोपी यांचे पासून जिल्ह्यातील सामान्य नागरीकांचे जिवीत व मालमत्तेला धोका असल्याने त्यांचे विरुध्द मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र-अमरावती यांचेकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मकोका) प्रमाणे कार्यवाही होणेबाबत प्रकरण प्रस्तुत करण्यात आलेले होते.सदर अनुषंगाने, मा. श्री. रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी उपरोक्त संबंधाने पो.स्टे. एम.आय.डी.सी. मलकापूर यांनी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करुन, आरोपी नामे 1) संकेत सुनिल उन्हाळे, वय २२ वर्ष, रा. गोपालकृष्ण नगर मलकापुर, 2) साहिल सुधाकर पालवे. वय १८ वर्ष, रा. गोपालकृष्ण नगर, मलकापुर. 3) देव तिलकसिंग राजपुत, वय २४ वर्ष रा. रामवाडी मलकापुर. 4) अरविंद उर्फ गब.या अजय साळुंके, वय १९ वर्ष. रा. लक्ष्मी नगर, मलकापुर. 5) हर्षल सुभाष घोंगटे, वय २३ वर्ष. रा. आव्हा ता. मोताळा. 6) गणेश विजय वायडे वय २१ वर्ष रा. संत ज्ञानेश्वर नगर मलकापुर. 7) कौशल संतोष घाटे. वय २२ वर्ष, रा. पवनसुत नगर, मलकापुर, 8) आदीत्य जनार्दन वानखेडे (फरार) वय 24 वर्ष, रा. मंगलगेट मलकापुर. 9) ऋषीकेश रामलाल इंगळे (फरार) वय 23 वर्ष, रा. माता महाकाली नगर, मलकापुर यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मकोका) प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीत, नववर्ष-2026 मध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी संघटीत गुन्हेगारी टोळीवर केलेल्या म.को.का. कार्यवाहीमुळे भविष्यात शरिराविरुध्द तसेच मालमत्ता संबंधीत गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास निश्चीत मदत होईल.वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्गदर्शन व कामगिरी पथक सदरची कामगिरी मा.श्री. निलेश तांबे-पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तसेच श्री. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि. श्री. नरेंद्र पेंदोर यांचे नेतृत्वात पोहेकॉ. संजयकुमार भुजबळ, पोना. राकेश नायडू स्था.गु.शा. बुलढाणा तसेच पोहेकॉ. राजेश बावणे, पोकॉ. गजानन वरखेडे पो.स्टे. एम.आय.डी.सी. मलकापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *