
वैभवने ८३ दिवसांत केली नर्मदा परिक्रमा पूर्ण
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर, ता.२ येथील श्री छत्रपती शिवाजी नगरातील रहिवासी तरुण वैभव प्रमोद चोपडे याने ८३ दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. त्या अनुषंगाने आगमन प्रसंगी ता. ३० डिसेंबर रोजी त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.वैभव चोपडे याने माता नर्मदेची परिक्रमा करण्याचा संकल्प केला व तो पूर्ण करण्यासाठी तो मार्गस्थ झाला होता. तब्बल ३ हजार ८०० किलो मीटरचा प्रवास त्याने ८३ दिवसांत पूर्ण केला आहे. दरम्यान ता.३० डिसेंबर रोजी तो स्वगृही परतणार होता. त्यामुळे त्याच्या स्वागताची तयारी स्थानिक लोकांच्यामलकापूर वैभव चोपडेचा सत्कार करताना नागरिकाच्या वतीने करण्यात आला.येथील श्री छत्रपती शिवाजी नगरातील श्री भवानी मंदिरात सर्वप्रथम नवनिर्वाचित नगरसेवक दुर्गेश राजापूरे यांच्या हस्ते वैभव चोपडे याचाभक्तीभावाने सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गणेशराव पाटील, विठ्ठलराव पवार, प्रमोद वरकडे, पुजारी दिनकरराव मराठे, पत्रकार हनुमान जगताप आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. दरम्यान श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून सुरुवात अन् त्याच ठिकाणी नर्मदा परिक्रमेचा शेवट करण्यात आला असल्याचे वैभवने सांगितले आहे
