शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ 13 डिसेंबर पासून 3 दिवसीय तब्लीक इस्तेमाचे आयोजन

बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ 13 डिसेंबरपासून तीन दिवसीय तब्लीक इस्तेमाचे आयोजन

जावेद शहा : :बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ 13 डिसेंबरपासून तीन दिवसीय तब्लीक इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (15 डिसेंबर) दुपारी 12 वाजता सामूहिक दुआने या इस्तेमाची सांगता झाली. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांतून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली.आयोजक आणि पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक येऊनही बुलढाणा-खामगाव रस्त्यावर कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अनुचित प्रकार घडला नाही. मुस्लिम युवकांच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या बंदोबस्तामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, शहर ठाणेदार रवी राठोड, ग्रामीण ठाणेदार गजानन कांबळे, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक काकवीपूर व वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते.सुमारे 100 एकर क्षेत्रात आयोजित या इस्तेमासाठी गेल्या दीड महिन्यांपासून तयारी सुरू होती. तीन दिवसीय कार्यक्रमात धर्मपालन, माणुसकी व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला असून पाच वेळच्या नमाजाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण परिसरात स्वच्छता व शिस्त पाळण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *