जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा

जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा

जावेद शहा बुलढाणा जिल्हा कारागृह, बुलढाणा येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. बंद्यांच्या मानवी हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बंद्यांना त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील यांनी कैद्यांसाठी उपलब्ध कायदेशीर संरक्षण व सुविधांबाबत
मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अमित मांजरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेत तुरुंगाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते बंद्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.मानवी हक्क ही केवळ संकल्पना नसून प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे—याची जाणीव समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे हीच या कार्यक्रमाची प्रमुख भावना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *