
बुलडाणा : एटीएम कटिंगसह अनेक गंभीर गुन्ह्यांत वॉंटेड असलेला फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत पकडला गेला.
जावेद शहा तमगाव पोलिस स्टेशनमध्ये अप. क्र. 05/2014 अंतर्गत दाखल असलेल्या कलम 379, 380, 427, 434 भादवी तसेच 2014 पासून सुरू असलेल्या एटीएम कटिंग प्रकरणांमध्ये आरोपी सजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान (वय 34, रा. जालन) हा सतत फरार होता.गुन्हे शाखा पथक त्याच्या शोधात सतत सक्रिय होते. आज, 10 डिसेंबर 2025 रोजी आरोपीला गावठाण परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून तमगाव पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले.या अटकेमुळे परिसरातील एटीएम कटिंग प्रकरणांवर महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक बुलडाणा/खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने करण्यात आली.कारवाईत उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ एनाज खान, अो.पोकॉ अमोल शेजोळ, पोकॉ अजीस परसुवाले, कैलास ठोबरे, शिवानंद हेणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तातडीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
