विश्व मानवाधिकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

विश्व मानवाधिकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

बुलडाणा : संयुक्त राष्ट्र संघाने 1948 मध्ये मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 10 डिसेंबर हा विश्व मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त देवेन्द्रप्रसाद सोनटक्के, राष्ट्रीय सचिव यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.पत्रात म्हटले आहे की, मानवाधिकार ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून समाजातील सर्व घटकांमध्ये जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. 10 डिसेंबर 2025 रोजी विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती रॅली, चर्चा सत्रे, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या निमित्ताने जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांना आयोजनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *