बुलडाणा शहरात गुटका–तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची मोठी धडक; ३३ जण ताब्यात

बुलडाणा शहरात गुटका–तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची मोठी धडक; ३३ जण ताब्यात

जावेद शहा बुलडाणा शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी विशेष मोहिम राबवत गुटका, तंबाखूजन्य पदार्थ आणि अवैध विक्री करणाऱ्यांवर एकाचवेळी पाच ठिकाणी धाडी टाकल्या. शहरातील पानटपऱ्या व दुकानांची तपासणी करत ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये ‘रिजेक्टेड’ चेक पद्धतीने तपासणी करून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटका, तंबाखू व प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. काही ठिकाणी गुटखा विक्रीसोबत गांजाचा रोलही आढळून आला.कारवाईदरम्यान पानटपरी चालक व दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यांची संख्या वाढण्यामागे अवैध तंबाखू विक्री हे एक मोठे कारण असल्याचे पोलिसांनी नमूद केले. नागरिकांकडून अशा बेकायदेशीर विक्रीची माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *