ग्रामपंचायती निवडणुका सहा महिने लांबणीवर?

ग्रामपंचायती निवडणुका सहा महिने लांबणीवर?महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या मुदत संपलेल्या तसेच आगामी निवडणुकांबाबत राज्य सरकारकडून सहा महिन्यांच्या विलंबाची शक्यता

जावेद शहा

ग्रामपंचायती निवडणुका सहा महिने लांबणीवर?महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या मुदत संपलेल्या तसेच आगामी निवडणुकांबाबत राज्य सरकारकडून सहा महिन्यांच्या विलंबाची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण आराखड्यांमधील तांत्रिक व कायदेशीर अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया वेळेवर होणे कठीण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.निवडणुका लांबल्यानंतर अनेक गावांत प्रशासकांची नियुक्ती होईल आणि निवडून आलेल्या सरपंचांचा कार्यकाळ थेट प्रशासनाकडे जाईल. विधानपरिषद निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना स्थानिक पातळीवरील शक्ती संतुलन साधण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल ठरू शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.दरम्यान, आरक्षणाच्या कारणास्तव निवडणूक आयोगाला वेळ लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. निवडणुका विलंबित झाल्यास त्या दिवाळीपर्यंत ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *