भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न

प्रतिनिधी जावेद शहा

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून 6 डिसेंबर रोज शनिवार ला सकाळीठीक9:00 कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्ग १०अ मधिल विद्यार्थी प्रसादतरळे तर प्रमुख वक्त्या म्हणून कु. शुभांगी गवते यांनी स्थान भूषवले तसेच शाळेचे प्राचार्यप्रमोद ठोंबरे तर पर्यवेक्षक संजय पीवटे सर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनीआपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा,संघर्ष करा या विषयी माहिती दिली. प्रमुख वक्त्या शुभांगी गवते यांनी डॉक्टर बाबासाहेबआंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला प्राचार्य प्रमोद ठोंबरे सर यांनीजीवनकार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषणामध्ये २५ विद्यार्थ्यांनी वगीत गायन मध्ये सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे संचलन वर्ग १० अमधिल कु. प्रतिक्षा गणेश मोरे व उजमा बानो पठाण यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचेशिक्षक सतीश शेटे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी शालिक चिंचोले, शंकर तरमळे, दीपक गवते याचीविशेष उपस्थिती होती.आभार प्रदर्शन वर्ग १०वा अ मधिल कु तनुश्री लहाने हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले पसायदान गाऊनकार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *