
लाकुडची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडलंट्रक सह 4 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्तबुलडाणा
जावेद शहा – 6 डिसेंबरजिल्ह्यात विनापरवाना झाडांची अवैध कत्तल तसेच वाहतूक सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हे तोडलेले लाकूड मध्यप्रदेश येथील बुरहानपुरला नेले जातो.अशाच एक लाकुडची अवैध वाहतूक करणारा ट्रक मोताळा तालुक्यात वन कर्मचाऱ्यांनी पकडला असून याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्राप्त माहिती अशी की मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत च्या धामणगाव परिसरातून लातूरची अवैध वाहतूक येतात असल्याची गुप्त माहिती मोताळा वाणी कर्मचाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार दिनांक 5 डिसेंबरच्या सायंकाळी खांडवी ते ब्राह्मणदा रोडवर वनपाल पी.एम. नारखडे आणि वनरक्षक के.एन.तराळ पाळत ठेऊन विनापरवाना जळतन लाकडे वाहतूक करीत असताना ट्रक क्र.MH-43 U-3794 याला पकडले. सदर ट्रक व जळतन लाकडे जप्त करून मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा येथे ठेवण्यात आले आहे.ट्रक मध्ये मोहा,निम,बेहडा प्रजातीचे जळतन होते.या कारवाईत एकूण 4 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं असून वनगुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
