
मेहकरच्या सुप्रसिद्ध तरुण डॉक्टाराचा अपघातात मृत्यू
बुलढाणा तालुका प्रतिनिधी चिखली-जालना मार्गावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघातात मेहकरचे सुप्रसिद्ध व तरुण डॉक्टर ऋषिकांत रमेश काटे (वय 36) यांचा मृत्यू झाला. अचानक रस्त्यावर धावून आलेल्या कुत्र्याला वाचविताना त्यांची एक्सयूव्ही 700 गाडी डिव्हायडरला ओलांडून पलटी झाल्याची माहिती मिळते.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना जावंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे दाखल केले. मात्र, गंभीर डोक्याला व छातीला झालेल्या दुखापतीमुळे उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.डॉ. काटे हे मेहकर येथील ‘ऋषीकृपा सोनोग्राफी सेंटर’चे संचालक होते. हॉस्पिटलच्या विस्तारासाठी ते बुलडाणा येथून परतत असताना दुर्घटना घडली.पोलिस तपास सुरू असून अपघाताचे कारण अचानक आलेल्या कुत्र्यामुळे वाहनाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरुण व लोकप्रिय डॉक्टराच्या निधनाने मेहकर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
