मतदान केंद्रावर आज सकाळी एका मतदाराने दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

मतदान केंद्रावर आज सकाळी एका मतदाराने दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

बुलढाण्यातील आयटीआय मतदान केंद्रावर आज सकाळी एका मतदाराने दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी पोलिसांच्या हातातून संबंधित बनावट मतदाराला हिसकावून नेल्याचा आरोप आहे.हा प्रकार मतदान तक्रार क्रमांक ६ मध्ये नोंदवला गेला असून, घटनास्थळावरील व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आरोपींनी पोलिसांच्या हातातून संशयिताला सोडवून नेल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितले.या प्रकरणी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन व गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. तसेच मतदान प्रक्रिया थांबवून पुन्हा नवे मतदान घेण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोग या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *