अंबड नगरपरिषद निवडणूक : स्ट्रॉंग रूमला कडेकोट त्रिस्तरीय सुरक्षा, EVM पूर्ण सुरक्षित

अंबड नगरपरिषद निवडणूक : स्ट्रॉंग रूमला कडेकोट त्रिस्तरीय सुरक्षा, EVM पूर्ण सुरक्षित

जावेद शाह प्रतिनिधी : अंबड

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दि. २ डिसेंबर रोजी पार पडलेले मतदान अत्यंत शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाले असून मतदानानंतर सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) अत्यंत सुरक्षितरीत्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या संपूर्ण परिसराला अभेद्य त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस प्रवेश निशिद्ध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक निरीक्षक संतोष घोडके, SDPO सिद्धेश्वर धुमाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी मनोज किर्दे यांच्या उपस्थितीत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समाधानाने स्ट्रॉंग रूमची पाहणी करून घेण्यात आली आणि त्यांच्याच उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली. सील केल्यानंतर स्ट्रॉंग रूमचा ताबा कडक बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस दलाकडे सोपविण्यात आला.स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तीन थरांची व्यवस्था उभारण्यात आली आहे. सर्वात आत SRPF च्या एक सेक्शनमधील सशस्त्र जवान २४ तास पहारा देत आहेत. मध्य वर्तुळात जिल्हा पोलिसांचा 1+8 गार्ड सतत तैनात असून बाह्य वर्तुळात स्थानिक पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी करडी नजर ठेवून आहेत. विनापरवाना प्रवेशावर संपूर्ण बंदी असून परिसरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी स्ट्रॉंग रूममधील अंतर्गत वीजपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे, मात्र बाह्य भागावर सतत देखरेख राहावी म्हणून आधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली असून त्याद्वारे २४ तास रेकॉ�

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *