राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थीनीस कांस्यपदक

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थीनीस कांस्यपदक

बुलढाणा तालुका प्रतिनिधी शहा

दि. 23 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील विद्यार्थीनी सृष्टी मोरे हिने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. बारामती येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेचेज् प्रणव देशमाने व सृष्टी मोरे हे 2 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात 19 वर्षे वयोगटात शाळेची विद्यार्थिनी सृष्टी किरण मोरे हिने चमकदार कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांनी अभिनंदन करीत संस्थेची मान उंचावणारी कामगीरी केली आहे. मागील वर्षी 27 विद्यार्थी राज्यस्तरावर खेळले होते तर शाळेला पाच पदक मिळाले होते. हिच परंपरा याही वर्षी कायम आहे. सृष्टीने शाळेचे नाव उज्ज्वल करीत इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार काढले. व शुभेच्छा दिल्या! या विजयासाठी शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. तर शाळेचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *