निवडणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांची माहिती

निवडणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज – पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांची माहिती

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

बुलडाणा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी विविध शहरांमध्ये पुरेशा संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहरांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी क्यूआरटी पथके, राज्य राखीव पोलीस दल, गुन्हेशाखा अधिकारी यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोणतीही गैरप्रकाराची माहिती मिळाल्यास त्वरित कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले.निवडणूक पारदर्शक, शांततापूर्ण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखत पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *