
शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर चे विद्यार्थी विभाग स्तरावर
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
दि 11 नोव्हेंबर शा. प्र.राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲन्ड ज्यु. सायन्स कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 6 विद्यार्थी जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजयी झाले. व त्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे.* *सविस्तर वृत्त असे की, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर चा विद्यार्थ्यांचा चमू जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी झाला होता.* *यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यां सोबत चुरशीची खेळी करत विजय मिळवला. यामध्ये 14 वर्ष वयोगटांमध्ये स्वप्निल वाघ याने विजय मिळवला तर 17 वर्षे वयोगटात धनंजय सोनाळकर, प्रेम ठाकूर, शे. काशीफ शे. कलीम तर 19 वर्षे वयोगटात पायल चिकटे व सुरज देशमुख या विद्यार्थ्यांनी विजयी होत त्यांची विभाग स्तरावर निवड झालेली आहे.* *या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट यांनी मेहनत घेतली तसेच शाळेचे अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी विजेता विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
