
जळगांव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने जळगांव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय चे आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा
जळगाव जामोद प्रतिनिधी
09 नोव्हेंबर 1995 ला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अंमलात आला आणी तेव्हापासून 09 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो त्यानुसार आज दिनांक 09/11/2025 रोजी तालुका विधी सेवा प्राधिकरण जळगांव जामोद आणी वकील संघ जळगांव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने जळगांव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय चे आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अधीक्षक श्री शेळके साहेब यांनी केले त्याप्रसंगी परिसरातील नागरिक आणी न्यायालयीन कर्मचारी वर्गही उपस्थित होता तर वकील संघाचे प्रतिनिधी म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मोहम्मद इरफान जमदार यांनी अध्यक्षीय भाषण केले तर विधी सेवा दिनानिमित्य मार्गदर्शन उपाध्यक्ष ॲड. राहुल इंगळे, सचिव ॲड. आनंद जोशी, कार्यकारी अध्यक्ष ॲड. दत्ता खेर्डेकर, यांनी केले आणी वकील संघ सदस्य श्री ॲड. व्ही पी वानखडे, जेष्ठ विधिज्ञ ॲड. व्ही टी मारोडे, ॲड. राणा प्रदिपसिंह सोळंके, ॲड. अभिजित वाघ, ॲड. बावणे राहुल डोंगरदिवे.इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात अधिवक्ता मंडळींनी विधी सेवा दिनाचे महत्व आणी कार्य याबद्दल मार्गदर्शन केले. नागरिकांना यनिमित्याने विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दिल्या जाणाऱ्या लोक अदालत,कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरे, तसेच कायद्याविषयक साक्षरता, न्यायलयीन कामात अधिवक्ता सहकार्य इत्यादी सेवा कश्याप्रकारे समाजातील आर्थिक दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणाने दुर्बल घटकास प्राप्त होऊ शकतात व समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक न्याय व समानता स्थापन करण्याचे संविधानाचे उद्दिष्ट प्राप्त करता येईल यावर मार्गदर्शन वकील मंडळींनी केले. त्याबरोबरच सर्वांनी स्वछता मोहिमेत भाग घेऊन समाजाप्रती स्वछता राखण्याची जवाबदारी सर्वांनी पार पाडली.
