घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटकएलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई

घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटक
एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहर

घरावर छापा मारून गांजा विकणाऱ्यास अटक
एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोथळी येथील अफरोज खान अनिस खान या व्यक्तीच्या घरावर छापा मारला ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली.पोलिसांनी आरोपीकडून १६,२०० रुपयांचा ८२० ग्रॅम गांजा जप्त केला.ही माहिती आधी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पथक तयार करून छापा टाकला.तपासात आरोपी गांजाची विक्री करत असल्याचे समोर आले.कारवाई व तपास:
सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अफरोज खान याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय राजेंद्र हिरडे पुढील तपास करत आहेत.थोडक्यात — बोराखेडी पोलिस व एलसीबीने गांजा विक्री प्रकरणी आरोपीस अटक करून १६ हजार रुपये किमतीचा ८२० ग्रॅम गांजा जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *