
पाणी फिल्टरच्या टाकीत विजेचा प्रवाह आल्याने शॉक लागून तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
जाफराबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पाणी फिल्टर केंद्रावर ही दुर्घटना घडली.सुरज साईदास हिवाळे (वय १८) हा तरुण पाणी फिल्टरची टाकी साफ करण्यासाठी आत उतरला असता, अचानक विजेचा प्रवाह आल्याने त्याला जोराचा शॉक बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण आकाश अरुण बोडे हा सुरजला वाचवण्यासाठी टाकीत उतरला असता, त्यालाही विजेचा शॉक बसून तो गंभीर जखमी झाला.अपघाताच्या वेळी विजेचा प्रवाह बंद नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले गेले आहेत.घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
