बुलढाणा जिल्हा मलकापूर एमआयडीसी ठाणेदार संदीप काळे यांची सोनाळा येथे बदली मजदूर संघटनेतर्फे सन्मान

बुलढाणा जिल्हा मलकापूर एमआयडीसी ठाणेदार संदीप काळे यांची सोनाळा येथे बदली मजदूर संघटनेतर्फे सन्मान

मलकापूर तालुका प्रतिनिधी : कबीर शेख

बुलढाणा, दि. 8 नोव्हेंबर 2025 मलकापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे ठाणेदार संदीप काळे सर यांची बदली सोनाळा येथे झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत नागरिकांमध्ये पोलिस दलाबद्दल विश्वास निर्माण केला.ठाणेदार काळे सर यांच्या बदलीनिमित्त बुलढाणा मजदूर संघटनेतर्फे त्यांचा सीड व शोल बुगे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मलकापूर तालुका अध्यक्ष कबीर शेख, तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी बोलताना कबीर शेख यांनी सांगितले की, “संदीप काळे सर यांनी प्रामाणिकपणे आणि जनतेच्या हितासाठी केलेले काम अनुकरणीय आहे. सोनाळा येथेही ते याच उत्साहाने काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कबीर शेख यांनी केले, तर आभार मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानले.मलकापूर तालुका प्रतिनिधी : कबीर शेख मराठी समाचार 24 न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *