आम्हा बुलढाणेकरांचा अभिमान

आम्हा बुलढाणेकरांचा अभिमान…

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

स्थानिक राम नगर बुलढाणा येथील रहिवाशी असलेले श्री.रंगनाथजी पवार यांचा मुलगा चि.अनिकेत रंगनाथ पवार याने देशात नावलौकिक कमावत एकाचवेळी भारतीय लष्करातील लेफ्टनंट व सोबतच तटरक्षक दलातील सहाय्यक कमांडंट या दोन उच्च पदाला गवसनी घातली आहे. चि. अनिकेत अतिशय कमी वयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एकाच वर्षात देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या दोन पदांवर त्याची निवड होणे हा योगायोग नसून त्याच्या व त्याच्या आई वडिलांच्या परिश्रमांचा परिपाक आहे. त्याचा भारतीय लष्कराच्या विविध पदांच्या निवड यादीत संपूर्ण देशातून 46 वा क्रमांक आला असून त्याने या दोन मधून ‘आर्मी लेफ्टनंट’ पदाची निवड केली आहे. त्याच्या या दैदीप्यमान, दुहेरी यशाबद्दल आज त्याची निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व चि. अनिकेत व त्याच्या आई वडिलांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्या सोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, माजी सैनिक सेल चे जिल्हाध्यक्ष अभिमन्युजी करपे, माजी सैनिक श्री अशोकजी किलबिले, प्रा प्रभाकर वारे , श्री अरुण धंदरचि. अनिकेतच्या यशाने जिल्ह्यातील नवयुवकांना आदर्श घालून दिला असून जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. त्याच्या या उत्तुंग यशा बद्दल त्याचे पुनश्च खूप खूप अभिनंदन….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *