
तहसीलदारांची शेतात जाऊन पाहणी
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
रायपूर परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसा अगोदर तहसीलदाराना निवेदन दिले होते शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने बुलढाना तालुक्याचे तहसीलदार विठ्ठल एस. कुमरे यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली.या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना झालेल्या अतिवृष्टी व पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी पिके उभ्या अवस्थेत पाण्याखाली गेल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी तहसीलदारांसमोर मांडल्या.तहसीलदार कुमरे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी आश्वासन दिले.शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या :पिक विमा लाभ तातडीने द्यावाअतिवृष्टीतील नुकसान भरपाईशेतीसाठी सिंचनाची योग्य व्यवस्थाया पाहणीदरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निलेश राजपूत, सुभाष आप्पा देशमाने ,व स्थानिक शेतकरी नंदू देशमुख, रमेश बापू ,शमीम सौदागर, व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
