जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अवैध वृक्षतोडीविरोधात कारवाई करताना वनकर्मचाऱ्यांवर हल्ला जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा बीट परिसरातील जंगल विभागात अवैध वृक्षतोडीविरोधात कारवाई करताना वनकर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कायमस्वरूपी अप क्रमांक ४४४/२०२५, कलम १२५, ३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी कु. रुपाली किसन राउत (वय ४१ वर्षे, धंदा- नोकरी वनरक्षक, रा. जानकी नगर, जळगाव जामोद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १५/०९/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता कम्पार्टमेंट क्र. ६२२, चालठाणा येथे, अवैध वृक्षतोडीबाबत गुप्त माहिती मिळाल्याने त्या घटनास्थळी गेल्या होत्या.यावेळी आरोपी गेटला गेदया अलावा (रा. कुवरदेव, ता. जळगाव जामोद) याने फिर्यादी व सोबत असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल या उद्देशाने दगडफेक करून जंगलात पळ काढला.या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास नापोका ५०४ इरफान शेख करीत आहेत. दाखल अधिकारी सफौ विनोद गायकवाड (ब.न. 588) आहेत. घटनेमुळे वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मराठी समाचार न्यूज 24 सठी नागेश भटकर मुख्य‌‌‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *