घनसावंगी तालुक्यात “ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी पुंगीबजाव मोर्चा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

घनसावंगी तालुक्यात “ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी पुंगीबजाव मोर्चा आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बुलढाणा तालुका (प्रतिनिधी) :जावेद शाह

घनसावंगी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी “ओला दुष्काळ जाहीर करा” या प्रमुख मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर पुंगीबजाव मोर्चा काढला. आज झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान शेतकरी महिला व मुलींच्या हस्ते मा. तहसीलदार श्रीमती वंजारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या ओल्या दुष्काळाशी संबंधित विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.या वेळी तालुका कृषी अधिकारी श्री. सखाराम पवळ उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासन व पत्रकार बांधवांनी यासाठी सहकार्य केले. आंदोलनकर्त्यांनी यांचे मनःपूर्वक आभार मानले.युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने चेतावणी देण्यात आली की, येत्या आठ दिवसांत जर शासनाने अतिवृष्टीग्रस्त भागाबाबत ओला दुष्काळ जाहीर करण्याचा आदेश काढला नाही, तर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठे व तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *