राष्ट्रीय बेरोजगार दिनी चिखलीत युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

राष्ट्रीय बेरोजगार दिनी चिखलीत युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन…उच्च शिक्षित तरुणांनी चहा, वडापाव, फळांची दुकाने थाटून व्यक्त केला संताप

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

चिखली : ‌ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र देशात युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही हातात नोकरी नसल्याने युवकांना चहा,वडापाव, फळांची दुकाने टाकावी लागत आहे. युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर व तालुका युवक काँग्रेसतर्फे बुधवार 17 सप्टेंबर रोजी चिखली येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहर व तालुका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चहा, फळे वडापाव, मकाची कणसे विकून तीव्र संताप व्यक्त केला. जयस्तंभ चौक येथे मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून वाढत्या बेरोजगारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवकांनी पदवी समारंभाचा शैक्षणिक पोषक परिधान करून “इंजिनिअर चायवाला”, “एमबीए वडा पाववाला”, “ग्रॅज्युएट फळ विक्रेता” अशा फलकांसह प्रतिकात्मक आंदोलन केले. या माध्यमातून उच्चशिक्षण घेतल्यानंतरही नोकरीसाठी तरुणांना भटकंती करावी लागते, आणि शेवटी छोट्या-मोठ्या व्यवसायावर पोट भरण्याची वेळ येते, ही वस्तुस्थिती मांडण्यात आली. दरम्यान “नोकरी चोर गद्दी छोड”, “स्टॉप वोट चोरी”, “रोजगार द्या – अन्यथा सत्ता सोडा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.सरकारने रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखावे आणि तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, शिवराज पाटील, विश्वद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *