
जळगांव जामोद शहरात प्रशासनाचे क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष…एक सुलभ क्रीडा संकुल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे
प्रतिनिधी जळगाव जामोद
गेल्या कित्येक वर्षांपासून निवेदन & पाठपुरावा करून सुद्धा जळगाव शहरात कुठल्या सुख सुविधा तर नाहीतच शिवाय साधे क्रीडा संकुल पण शहरात उपलब्ध नाही…
अशा बिकट परिस्तीत ही जळगाव च्या मातीतील उत्कृष्ट धावपटू ओपन अथलॅटिक पंजाब म्हसाळ हे गावाचं नाव राज्यभर उंचावत आहे ही अभिमानाची बाब आहे …
जळगाव शहर हे ग्रामीण आदिवासी विभाग& खानपट्टीला लागून असेलेले शहर आहे…पोलीस & आर्मी व इतर सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना शेताच्या रस्त्याने धावावं लागतंय ही सर्वात मोठी खंत आहे…
बरेचसे मूल आपण पाहतो सकाळी पहाटे हायवे रोड वर्ती रनिंग आणी वॉर्मअप करत असतात…पहाटेचा वेळ असतो ट्रॅव्हल्स बस फार वेगाने वाहत असतात…
अशामध्ये 19 जानेवारी 2025 रोजी बीड जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एका भरधाव एसटी बसने चिरडले, ज्या मध्ये तिघांचा जागीच मुर्त्यू झाला व दोघे गंभीर जखमी झाले जळगाव शहरात अशी शक्यता नकारता येत नाही त्या आधीच प्रशासनाने जागृत होऊन एक सुलभ क्रीडा संकुल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे
