समाजासाठी ज्योतिषाचा दीप उर्मिला बोरसे यांना राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

समाजासाठी ज्योतिषाचा दीप उर्मिला बोरसे यांना राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

समाजसेवा आणि अध्यात्माच्या संगमातून महिलांच्या जीवनात नवा प्रकाश पेरणाऱ्या सौ. उर्मिला नानाजी बोरसे यांचा नुकताच “दिशा महाराष्ट्राची” या प्रख्यात टीव्ही चॅनलकडून राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला. न्यू पनवेल, दीप सिटी येथील उर्मिला बोरसे यांचा हा सन्मान चॅनलचे संचालक तुषार गौतम नेवरेकर व त्यांच्या टीमच्या हस्ते प्रदान करण्यात आला.‘ज्या घरात अंधार आहे, तिथे मी दीप नेते’ – अशी आहे त्यांची विचारधाराउर्मिला बोरसे या केवळ ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञ नाहीत, तर त्या एक संवेदनशील अध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत समाजातील हजारो महिलांना जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी योग्य दिशा दाखवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ हजारांहून अधिक महिलांना नवसंजीवनी लाभली असून, त्यापैकी २ हजारांपेक्षा जास्त महिलांनी आपला अनुभव ‘आयुष्याला मिळालेली नवी दिशा’ म्हणून वर्णन केला आहे.सोपे उपाय, खोल अर्थशिक्षणात अडथळे, मानसिक ताण, आरोग्याच्या समस्या, विवाहात अडचणी आणि कौटुंबिक कलह — या सगळ्या गुंतागुंतीच्या समस्यांवर त्यांनी अध्यात्मिक साधना, उपासना व ज्योतिषशास्त्र यांच्या आधारे साधे पण प्रभावी उपाय दिले. विशेषतः गरजू आणि एकट्या पडलेल्या महिलांना, उर्मिला बोरसे यांनी आत्मविश्वासाचं बळ दिलं आणि त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण आणला.पुरस्कार स्विकारताना त्या म्हणाल्या.“हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कार्याचा नाही, तर समाजाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. मी फक्त एक माध्यम आहे — अध्यात्म, ज्योतिष आणि प्रेमाच्या भाषेत संवाद घालणारी. या सन्मानामुळे माझ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *