शेगाव शहरात ताशपत्ता जुगारावर पोलिसांची धडक कारवाई सात जणांना अटक

शेगाव शहरात ताशपत्ता जुगारावर पोलिसांची धडक कारवाई सात जणांना अटक

शेगाव प्रतिनिधी अमीन शेख ससंपादक

शेगाव | दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री पोलिसांनी जय अंबेनगर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी ताशपत्ता जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करून एकूण 77 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस ठाण्यातील फिर्यादी पो.हे.का. संतोष शंकर गवई (ब.नं. 715) यांच्या खबरीवरून मध्यरात्री 12 ते 12.40 वाजेदरम्यान छापा टाकण्यात आला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी एक्का-बादशहा नावाचा ताशपत्त्यांचा जुगार खेळत असताना आरोपी रंगेहाथ पकडले गेले.अटक आरोपी1. मंगेश गोविंदा कराळे (34, संत गाडगे नगर)2. विजय संजय गायकवाड (29, ताडपुरा)3. योगेश गजानन कवळकार (26, इंदिरानगर)4. पवन नामदेव आटकर (24, इंदिरानगर)5. श्रीकृष्ण दिनकर गायकवाड (35, संत गाडगे बाबा चौक)6. श्रीराम उर्फ राम गजानन चांदुरकर (25, आइस फॅक्टरी जवळ) 7. गोपीचंद्र उत्तम वाघ (45, गडीजवळ)जप्त मुद्देमालरोख रक्कम 7,000 रुपये, ताशपत्ते 50 रुपये, विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपये, हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक BGJ-05 PB-1482) किंमत 60,000 रुपये व एक लाल रंगाची सतरंजी असा एकूण 77,050 रुपयांचा जुगार साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आला.सदर प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी कायम अप क्र. 511/2025, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.का. गणेश बाकेकर (ने 1244) यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.शेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेचा विषय बनला असून जुगारबाजांना धडा शिकविणारी ही कारवाई ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *