शिवसेनेचे नेते राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना तालुका जनसंपर्क कार्यालयाला दिली भेट

शिवसेनेचे नेते राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी ११ सप्टेंबर रोजी तालुका प्रमुख विजय साठे यांच्या शिवसेना तालुका जनसंपर्क कार्यालयाला दिली भेट

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : शिवसेनेचे नेते राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी ११ सप्टेंबर रोजी तालुका प्रमुख विजय साठे यांच्या शिवसेना तालुका जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संघटनेचा आढावा घेत विजय साठे यांचेसोबत चर्चा केली. दरम्यान विजय साठे यांनी नामदार आबिटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केल शिवसेना नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विनंतीवरून राष्ट्रीय महामार्गावरील दसरखेड परिसरातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. दरम्यान बाजूलाच त्यांना शिवसेनेचे कार्यालय नजरेत पडले. यासंदर्भात त्यांनी उपस्थिताकडे विचारणा करीत आपणाला तालुक्याच्या या कार्यालयाला सदिच्छा भेट द्यायची आहे अशी इच्छा प्रकट केली व कार्यालयाकडे पावले वळवलीत. दरम्यान कोणत्या पदाधिकाऱ्यांचे कार्यालय आहे याबाबत ते सोबत उपस्थित लोकांकडे विचारणा करीत असतानांच विजय साठे समोर आलेत व त्यांनी स्वतःची ओळख दिली. साहेब मीच मलकापूर तालुक्याचा तालुका प्रमुख असून हे आपलेच जनसंपर्क कार्यालय असून कृपया आपण आपल्या कार्यालयाकडे यावे अशी नम्रपणे विनंती केली असता आरोग्यमंत्र्यांनी स्मित हास्य करीत कार्यालयात प्रवेश केला. प्रवेशानंतर कार्यालयाची पाहणी करीत तालुक्याच्या ठिकाणी आपण खूप छान कार्यालय बनवले आहे. या कार्यालयाद्वारे आपण सर्वसामान्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता याबाबत विजय साठे यांच्याकडून विजय साठे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला किती गावे संलग्नित आहेत व किती सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांना या आरोग्य केंद्रापासून उपचार सुविधा मिळवून दिलासा मिळू शकतो याबाबत सुद्धा माहिती जाणून घेतली. दरम्यान विजय साठे यांचे कार्य पाहून त्यांनी विजय साठे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पक्षाला अभिप्रेत असे समाजकार्य आपण करतच आहात यात दुमत नाही असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान ना प्रकाश आबिटकर यांचा विजय साठे यांनी शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार सुद्धा केला. तर प्राथमिक आरोग्य केंद्र संदर्भात तसेच संघटनेबाबत काही अडीअडचणी असल्यास आपण मुंबईला येऊन थेट संपर्क करा माझ्या वतीने मी आपली प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही सुद्धा नामदार आबिटकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *