जळगाव जिल्ह्यातील जयेश पाटील यांना ‘खान्देश कृषी सम्राट पुरस्कार’

जळगाव जिल्ह्यातील जयेश पाटील यांना ‘खान्देश कृषी सम्राट पुरस्कार

प्रतिनिधी जळगाव (खा)

चोपडा तालुक्यातील कुसुंबे गावचे प्रगतशील शेतकरी जयेश पाटील यांची यंदाच्या ‘खान्देश कृषी सम्राट पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. दैनिक भास्कर आणि 94.3 MY FM यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो.शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनात सातत्यपूर्ण वाढ, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यांची दखल घेऊन परीक्षक मंडळाने पाटील यांना हा मानाचा सन्मान जाहीर केला आहे.या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नवी प्रेरणा मिळणार असून आधुनिक शेतीतूनही अधिक उत्पन्न व यश मिळवता येते हे अधोरेखित झाले आहे.या यशाबद्दल पाटील यांनी आयोजक संस्था व परीक्षक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यात शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून शाश्वत व आदर्श कृषी पद्धती विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *