शालेय सिलंबम स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटचे विद्यार्थी विभागस्तरावर

शालेय सिलंबम स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटचे विद्यार्थी विभागस्तरावर

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

शा.प्र दि. 10 सप्टेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट चा चमू बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिलंबम क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये चमकदार खेळ खेळत शाळेच्या 8 विद्यार्थ्यांनी विजय मिळवत त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या सिलंबम स्पर्धेत देवयानी किशोर सिरसाट, पूर्वा जिवन कोरके, शामल विलास तायडे, समता विजय जाधव, स्वप्निल गजानन वाघ, ओम तुळशिदास शिंगणे, नैतिक मर्दानसिंग कव्हाळ, यश रविंद्र तरमळे आदी विद्यार्थ्यांनी सिलंबम स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळवीत विजय संपादन केला. या विजयामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.. या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके व प्राचार्य किशोर सिरसाट यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. या विजयामागे शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *