जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

जनता विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरापिंपळगाव सराई, ता. बुलढाणा – येथे असलेल्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रमोद ठोंबरे व पर्यवेक्षक संजय पिवटे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमा आणि दहीहंडीचे विधिवत पूजन करून झाली. या वेळी विद्यार्थ्यांचे ढोल पथक, दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले मनोरे, पारंपारिक आकर्षक वेशभूषा, तसेच राधा-कृष्ण यांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गीते, गवळणी व भजने सादर केली. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उस्फूर्त नृत्याने वातावरण आनंदमय झाले.या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी व नियोजन कार्यक्रम प्रमुख अविनाश सोलकर आणि वर्ग नववी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी केली. मंचावर पर्यवेक्षक संजय पिवटे, सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *